दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार
दात वाचवण्यासाठीचे उपचार कसे आधुनिक होत गेले हे पाहूया- पूर्वी आणि आता दात किडण्याच्या अवस्था अवस्था क्र. १. या अवस्थेत कीड ही दाताच्या ‘इनॅमल’ या सर्वात बाह्य़ आवरणापुरतीच मर्यादित असते. अशा वेळी किडलेल्या दातात किंवा दाढेत छोटासा खड्डा म्हणजे ‘कॅव्हिटी’ तयार होते आणि त्यात अन्न अडकत राहते; पण वेदना होत नाहीत. दात किंवा दाढा दुखत नसल्यामुळे या प्राथमिक अवस्थेत रुग्ण दातांचा इलाजही करून घेत नाहीत. अवस्था क्र. २. यात कीड दातांच्या पुढच्या थरापर्यंत म्हणजे ‘डेंटिन’पर्यंत पोहोचते. या वेळी कॅव्हिटी मोठी झालेली असते. क्वचित दात किंवा दाढ दुखतेही. पण रुग्ण दातात अडकलेले अन्नाचे कण विविध प्रकाराने काढून टाकतात, त्या बाजूने खाण्याचे टाळतात. किडलेल्या दाताचा इलाज करणे या अवस्थेतही टाळलेच जाते. अवस्था क्र. ३ . या अवस्थेत कीड दाताच्या सर्वात आतल्या थरापर्यंत म्हणजे ‘पल्प’पर्यंत किंवा नसेपर्यत पोहोचते. दातातली कॅव्हिटी खूप मोठी झालेली असते. दात ठणकत असतो. रुग्णांना वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात आणि दातांच्या दवाखान्यात धाव घेण्याची वेळ येते. अवस्था क्र. ४ आता मात्र कीड द