दंतव्यंगोपचाराबद्दल ( Ortho Braces) - समज-गैरसमज

दंतशास्त्रामध्ये ही उपचार पद्धती अतिशय अवघड व वेळ घेणारी असल्यामुळे तसेच आधुनिक उपचारपद्धतीबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे ब-याच गैरसमजुती सामान्य जनतेत प्रचलित झाल्या आहेत.

दंतव्यंगोपचारात विविध उपचार पद्धती कोणत्या आहेत?
दंतव्यंगोपचारात मुख्यत: दोन प्रकारच्या क्लिप्स वापरण्यात येतात. काढघालीची क्लिप्स आणि फिक्स क्लिप्स. यामधील काढघालीची क्लिप्स ही जबड्यामध्ये दोष असल्यास किंवा थोड्या प्रमाणात दाताशी निगडित व्यंग दूर करण्यासाठी वापरण्यात येते. जर जास्त प्रमाणात वेडेवाकडे दात असतील, पुढे आलेले दात किंवा दात काढून उपचार करण्याची गरज पडल्यास फिक्स क्लिप्स वापरण्यात येते. 

फिक्स क्लिपमध्ये मुख्यत: 3 प्रकार असतात.
मेटलची क्लिप,
दातांच्या रंगाची क्लिप आणि 
जिभेच्या बाजूने लावण्यात येणारी क्लिप.


उपचारासाठी किती वेळ लागतो ?
सर्वसाधारणपणे दंतव्यंगोपचारासाठी एक ते दोन-अडीच वर्षांचा कालावधी लागतो. हा काळ रुग्णाची समस्या, वापरण्यात आलेल्या उपचार पद्धतीनुसार ठरतो. या कालावधीदरम्यान रुग्णाला उपचारासाठी महिन्यातून किमान 1 किंवा 2 वेळेस दंतव्यंगोपचारतज्ज्ञांकडे जावे लागते.


उपचारासाठी योग्य वय कोणते?
दंतव्यंगोपचारातील विविध उपचार पद्धती रुग्णांच्या वयानुसार ठरवता येतात. बाल अवस्थेपासून ते प्रौढापर्यंत उपचार करता येतात. मात्र, दंतव्यंगोपचारतज्ज्ञच योग्य मार्गदर्शन करू शकतात.


दंतव्यंगोपचारात फक्त वेड्यावाकड्या दातांचाच उपचार होतो का?
असे काही नाही. वेड्यावाकड्या दातांबरोबरच जबडा मागे किंवा पुढे घेता येतो. मात्र, हे रुग्णांच्या वयानुसार ठरवता येते. जबड्यांच्या योग्य संगतीनुसार चेह-याच्या ठेवणीत विशेष फरक पडतो.


उपचारासाठी दात काढणे नेहमीच आवश्यक असते का ?
ज्या रुग्णांमध्ये निसर्गत: दातामध्ये फटी असतात किंवा दात सरळ करण्यासाठी अतिशय कमी प्रमाणात जागेची गरज असते अशा रुग्णांमध्ये दात न काढताही उपचार होऊ शकतो. ज्या रुग्णांमध्ये दात अतिशय वेडेवाकडे किवा पुढे आलेले असतात त्यांचे दात काढून उपचार करावा लागतो.

उपचारासाठी कोणते दात काढतात ?
मुख्यत: समोरचे दात दिसण्यासाठी, तर दाढा अन्न चावण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे दंतव्यंगोपचारात दात काढण्याची गरज असल्यास उपदाढा-सुळे, दाढा यांच्यात स्थित असतात. त्या काढाव्या लागतात, परंतु काही रुग्णांमध्ये उपदाढाऐवजी अतिशय खराब अवस्थेत समोरील दात अथवा दाढा काढण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
उपचारासाठी वापरण्यात येणा-या क्लिप्समुळे रुग्णांना थोडा काळ अस्वस्थता वाटते. तोंड येणे, क्लिप टोचणे अशा समस्या उद्भवतात. पण कालांतराने ही समस्या थोड्याच काळासाठी भासते.

Comments

Popular posts from this blog

‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?

दात बसवणे- प्रकार आणि पद्धती ( कॅप, ब्रीज वर्क, इंप्लांट इ. )

दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार