कवळी - एक वरदान?

वयपरत्वे दात दुखू लागतात, अनेकदा ते हलून पडून जातात. विविध उपचारांनी ते दुरूस्त करता येत नाहीत. अशावेळी, कृत्रिम दात वा कवळी लावण्याचा सल्ला दिला जातो. ही कवळी लावली म्हणजे दातांचे कार्य सुरळीत झाले असे होत नाही. त्यानंतर पहिल्या वर्षी काही महत्त्वाच्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात.
दात नसलेल्या जागी तो काढता येतो असा कृत्रिम दात बसवणे, म्हणजेच कवळी बसवणे होय. ही कवळी अॅक्रेलिक रेसिनपासून बनते. काही वेळा ती वेगवेगळ्या धातूंच्या विविध मिश्रणांनी बनवली जाते. सगळे दात हलत असतील वा पडायला आले असतील तर एक कवळी दातांसारखे काम करून अन्य सगळ्या दातांची तूट भरून काढते. तोंडातला एखादा दात पडला असेल तर, त्याची जागा कृत्रिम दात बसवून घेतली जाते. हा दात इतक्या बेमालुमपणे बसवला जातो की, तो अन्य दातांची स्थिती बदलू देत नाही. कवळी बसण्याचे दोन प्रकार आहेत, त्यात एक पारंपरिक पद्धत आहे व दुसरी तत्काळ.
पहिल्या प्रकारची कवळी सगळे दात काढल्यानंतर एक महिन्याच्या अंतराने बसवली जाते तर दुसऱ्या प्रकारात दात काढल्यानंतर लगेचच ही कवळी बसवली जाते. त्यामुळे दुसरा प्रकारच्या कवळीच्या रोपणामध्ये वेळ अधिक जातो, तसेच त्यात गुंतागुंतही अधिक असते.
जुने दात काढल्यानंतर त्यातील जखम भरण्यास पुरेसा अवधी न देता कवळी बसवली जाते. कोणत्याही कृत्रिम अवयवासारखी कवळीदेखील सुरवातीला त्रास देते. नवे दात हुळहुळत असल्याने तोंडात सारखी लाळ गोळा होते असे वाटते किंवा बोलतानाही थोडी गडबड होते. हे टाळण्यासाठी पहिल्या टप्प्यात तोंड कसे धुवावे, अन्न कसे खावे, गरम अन्नाचे घास घेणे कसे टाळावे अशा अनेक महत्त्वाच्या डॉक्टरी सल्ल्यांचे पालन करावे लागते.


कवळी ची अशी काळजी घ्या
* प्रत्येक वेळी खाल्यानंतर कवळी साफ करावी.
* शक्य असेल तेव्हा कवळी घासण्याचा सल्लाही दिला जातो.
* कवळीप्रमाणे तोंडही स्वच्छ धुवावे.
* जर काही नैसर्गिक दात शिल्लक असतील व नसलेल्या दातांच्या ठिकाणी कृत्रिम दात लावलेले असतील तर ते दातही स्वच्छ धुवावेत.- कवळी लावल्यानंतर दोन वर्षांनी पेशी आणि हाडे काही प्रमाणात आकुंचन पावतात, तेव्हा कवळी सैल होते. वाढत्या व कमी होणाऱ्या वजनामुळेही कवळी घट्ट वा सैल होत राहते. गरज पडेल तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने कवळी घट्ट किंवा सैल करून घ्यावी.
* रात्रभर कवळी डॉक्टरांनी दिलेल्या मिश्रणामध्ये बुडवून ठेवावी.


काही महत्त्वाच्या सूचना
* गरम अन्न घेणे टाळावे.
* कडक पदार्थ खाऊ नयेत.
* जोपर्यंत हिरड्यांना तेथील पेशींनी नव्या दातांची सवय होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावी.
* रोज जीभ स्वच्छ करण्यास विसरू नये, नरम ब्रशने हिरड्या स्वच्छ कराव्यात.
* कवळीसाठी बनवलेला विशेष ब्रश मिळतो, त्याचा वापर करून कवळी घासावी
* मऊ ब्रशने हिरड्याही स्वच्छ कराव्यात.

Comments

Popular posts from this blog

‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?

दात बसवणे- प्रकार आणि पद्धती ( कॅप, ब्रीज वर्क, इंप्लांट इ. )

दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार