रूट कॅनल दातांसाठी वरदान

दातांना कीड लागले तर त्यांना काढण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. मात्र दंत चिकित्सेमध्ये संशोधन झाल्याने किडलेल्या दातांवर ही उपचार करून त्यांना सुस्थितीत येऊ शकतात. रुट कॅनल ही अशी उपचार पद्धती आहे की, सुंदर मोत्यांसारख्या दातांना ते एक वरदानच ठरले आहे.
दात किडल्याने व्यक्तीला मरणाच्या वेदना होतात. दाताला वरच्या वर किड लागले असेल तर त्यावर सिरामिक अथवा मेटल कॅप बसविली जाते. मात्र दाताला मुळापासून किड लागले असले तर त्याला पूर्वी दंत चिकित्सांकडून काढण्या शिवाय त्याला दुसरा पर्याय नव्हता. आता मात्र त्यावर विज्ञानाने प्रगती साधली असून रूट कॅनल ही पद्धत शोधून काढली आहे. रूट कॅनलमुळे मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. दात आहे म्हणून आपण कुठलाही पदार्थ चावून चावून खाऊ शकतो. अन्यथा दान पडलेल्याची अवस्था काय आहे हे तर आपण पाहतोच आहे.


तोंडातील दातांच्या मालिकेतील एखादा दात काढला तर त्याचा परिणाम तोंडातल्या इतर दातांवर होतो. तो म्हणजे दात काढल्याने त्याची जागा ही रिकामी होते व त्या आजूबाजूचे दात घासण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे एक एक करून सगळे दात खिळखिळे होतात. तसेच चेहऱ्याचा शेप ही बिघडतो. एका दातावर एक किंवा त्यापेक्षा अधिक रूट कॅनल तयार होऊ शकतात. या गोष्टीसह आपली सुखमयी आयुष्य वाचवायचे असेल तर किडलेल्या दातांवर रूट कॅनल करणे म्हणजे आपल्या सुंदर दातांना नवसंजीवनी देणे होय.


रूट कॅनल करण्याची पद्धती:
दाताच्या किडलेल्या भागावर ड्रिल करून किडलेला भाग काढून टाकला जातो. त्यानंतर त्याभागाची हायड्रोजन पॅराक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईड स्वच्छता केली जाते. त्यानंतर फिलरने तो खोल केलेला भाग भरला जातो. सिल्वर फिलिंग किंवा टूथ कलर फिलिंगने दात सील केला जातो. दाताला मजबुती दिल्यानंतर त्यावर कॅप बसविणे आवश्यक असते. अन्यथा दात तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?

दात बसवणे- प्रकार आणि पद्धती ( कॅप, ब्रीज वर्क, इंप्लांट इ. )

दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार