Posts

लॉकडाउन आणि आठवणीतली मुंबई लोकल

Image
  कोरोना हे तू काय केलसं? मुंबईत लोकल रेल्वेने प्रवास करणं म्हणजे विश्वरुपदर्शन आहे. संयमाची, शारीरिक कणखरतेची, चिवटपणाची, संवादकौशल्याची कसोटीच जणू. सकाळी खरंतर पहाटेपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातून जनांचा प्रवाह मुंबईच्या दिशेने कामासाठी ओसंडून वाहत राहतो. 8.10ची फास्ट पकडणं हे अनेकांसाठी आद्य कर्तव्य असतं. दिवसाचं वेळापत्रक रेल्वेकेंद्रित असतं. गच्च भरून आलेल्या ट्रेनमध्ये उडी मारून आत जाणं, बसायला जागा मिळावी यासाठी फिल्डिंग लावणं, आपली बॅग वरती डोक्यावरच्या बॅगांच्या चळतीत घुसवणं, आपल्या सगळ्या वस्तू जागेजमी आहेत ना याची चाचपणी करणं आणि मोबाईलचे इअरफोन काढून गर्दीतही बेट होणं हे अनेकांचं आयुष्य असतं. दोस्तांचा ग्रुप असेल तर ट्रेन्डिंग टॉपिकवर गप्पा सुरू होतात. काल रात्री झालेल्या मॅचवर गप्पा रंगतात. जोकवर हशा पिकतो. खांदेपालटाच्या स्टेशनवर म्हणजे बसलेली माणसं उठतात आणि पॅसेज मध्ये उभं असणाऱ्यांना बसायला देतात. माणुसकीचा धर्मचं तो.चौरस फूटात जास्तीत जास्तीत माणसं कोंबून भरलेल्या त्या डब्यातून बाजूने मंदिर गेलं की एक हाताने दर्शन घेतात. प्रत्येक स्टेशनवर 'अंदर चलो' म्हणत माण

‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’

Image
सिकल सेल ’ या आजाराविषयी सांगणाऱ्या जाहिराती रेडिओवर, टीव्हीवर बऱ्याचदा ऐकायला, पाहायला मिळतात. पण हा आजार नेमका काय असतो, तो कुणाला होण्याची शक्यता अधिक, त्यावर काही उपचार आहेत का, याबद्दल अनेकांना माहिती नसते. १९ जून हा दिवस जागतिक सिकल सेल दिवस म्हणून पाळला गेला.  या निमित्ताने या आजाराविषयी- 'सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता . ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. पण सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. या दोषाला ‘सिकलिंग गुणधर्म’ असे म्हणतात. निरोगी माणसाच्या आणि सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना सिकल सेल पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून आला. दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव देण्यात आले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे

डिप्रेशन आणि आपण....

Image
आज अचानक बातमी आली आणि धक्काच बसला. सुशांत सिंग राजपूत ने आपल्या मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केली. तसे या वर्षी बरेच धक्के आपण सहन केलेत. कितीतरी चांगल्या कलाकारांना गमावलं आपण यावर्षी. त्यातले काहीजण वृध्द होते, काही आजारी आणि काही मानसिकरीत्या आजारी. डिप्रेशन सध्या सगळ्यात मोठा आजार झालंय. होय, कोरोणा पेक्षा ही भयानक आजार. इतर आजारांमध्ये तुम्हाला आजाराची लक्षणं दिसतात, इतर लोक तुमची काळजी घेतात पण डिप्रेशन हा असा आजार आहे की त्यात बऱ्याचवेळा तुम्हालाच कळतं ही नाही, ना तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना. खरतर आपल्याकडे या गोष्टीला तेवढस महत्वचं दिलं जात नाही. बरेच जण तर बोलायलाच घाबरतात कारण आपण जर बोललो तर लोक हसतील, नाहीतर आपल्याला थोडंसं सकारात्मक काहीतरी बोलुन ज्ञान द्यायचं काम करतील, यापुढे काही होणार नाही. डिप्रेशन हा सध्याच्या तरुण पिढीत वाढणारा सगळ्यात वाईट आजार झालाय. सोशल मीडियाच्या जगात १००-२०० मित्र असून सुद्धा ज्याच्याशी आपण आपल्या मनातलं शेअर करू शकतो, जो आपल्याला समजून घेऊ शकतो असा एकही मित्र आपल्या भेटू नये? का आपण उघडपणे आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करू शकत नाही

दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार

Image
दात वाचवण्यासाठीचे उपचार कसे आधुनिक होत गेले हे पाहूया- पूर्वी आणि आता दात किडण्याच्या अवस्था अवस्था क्र. १. या अवस्थेत कीड ही दाताच्या ‘इनॅमल’ या सर्वात बाह्य़ आवरणापुरतीच मर्यादित असते. अशा वेळी किडलेल्या दातात किंवा दाढेत छोटासा खड्डा म्हणजे ‘कॅव्हिटी’ तयार होते आणि त्यात अन्न अडकत राहते; पण वेदना होत नाहीत. दात किंवा दाढा दुखत नसल्यामुळे या प्राथमिक अवस्थेत रुग्ण दातांचा इलाजही करून घेत नाहीत. अवस्था क्र. २. यात कीड दातांच्या पुढच्या थरापर्यंत म्हणजे ‘डेंटिन’पर्यंत पोहोचते. या वेळी कॅव्हिटी मोठी झालेली असते. क्वचित दात किंवा दाढ दुखतेही. पण रुग्ण दातात अडकलेले अन्नाचे कण विविध प्रकाराने काढून टाकतात, त्या बाजूने खाण्याचे टाळतात. किडलेल्या दाताचा इलाज करणे या अवस्थेतही टाळलेच जाते. अवस्था क्र. ३ . या अवस्थेत कीड दाताच्या सर्वात आतल्या थरापर्यंत म्हणजे ‘पल्प’पर्यंत किंवा नसेपर्यत पोहोचते. दातातली कॅव्हिटी खूप मोठी झालेली असते. दात ठणकत असतो. रुग्णांना वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात आणि दातांच्या दवाखान्यात धाव घेण्याची वेळ येते. अवस्था क्र. ४ आता मात्र कीड द

‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?

Image
तोंडात येणारी शेवटची दाढ म्हणजे अक्कल दाढ . वयाच्या १७ ते २५ वर्षांपर्यंत अक्कल दाढ तोंडात येऊ लागते. कधी कधी २५ वर्षांनंतर सुद्धा ही दाढ अचानक तोंडात येऊ शकते. असे म्हटले जाते की आधीच्या काळात मनुष्याचा आहार हा खूप उग्र प्रकारचा असल्याने दात झिजून जात असत. मग दात झिजल्याने जबड्यात बदल घडून येत. तोंडातील सगळे दात नैसर्गिकरीत्या हालचाल करून घडलेल्या बदलाची भरपाई करत असत. म्हणूनच तरुणपणी तोंडात येणार्या अक्कल दाढेला पुरेशी जागा मिळून दात सहजपणे बाहेर निघून येत असत. आताच्या काळात आहार मऊ, दातांना त्रास न होणारा असतो. तसेच हल्लीच्या काळात ऑर्थोडोंटिस्टच्या साहाय्याने वाकडे-तिकडे असलेले दात सारखे करण्याची पद्धत खूपच लोकप्रिय झाली असून लहान वयातच मुलांचे दात चांगले दिसावे म्हणून ऑर्थोडोन्टिस्टचा भरपूर वापर केला जातो. यामुळे तरुण वयात येणार्या अक्कल दाढेला जागाच शिल्लक राहात नाही. याचा परिणाम म्हणून अक्कलदाढेसंबंधित समस्या आढळून येतात. इम्पॅक्टेड दाढ  – तोंडात पुरेशी जागा नसल्याने, दातांवरती असलेली हिरडी खूप जाड होऊन दाताला वर येऊ देत नसल्याने, तसेच दातांभोवती असलेले हाड किंवा अक्

दातांना ब्रश करण्याच्या योग्य पद्धती !!!!

Image
बऱ्याच वेळा काही लोक विचारतात कि दातांना ब्रश करण्याच्या पद्धती असतात का?  आपल्याला कशा पद्धतीने ब्रश करायला हवे?  चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्याने कोणत्या समस्या उद्भवतात…  जसे दात ठिक पद्धतीने साफ न होणे, दातांचे हलणे, दात दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात किडणे इत्यादी समस्या होतात. कदाचित आपल्याला योग्य पद्धतीने ब्रश करण्याची माहित नसेल. दात आपल्या व्यक्तिमत्वाचे एक महत्वपूर्ण अंग आहेत. आपण जशी आपल्या शरीराची साफ सफाई करतो त्याच प्रकारे आपल्या दातांची देखभाल करणे अत्यावश्यक आहे. ब्रश करण्याच्या पद्धती चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्याने दात तर स्वच्छ होत नाहीत पण आपल्या दातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपण लहान पणा पासून एकाच पद्धतीने दात साफ करत आलो आहोत, ते म्हणजेच horizontal (आडवे ) दात साफ करत आलो आहोत. या पद्धतीने हिरड्यांना व दातांना नुकसान पोचू शकतो. दातांना योग्य पद्धतीने ब्रश करण्याची पद्धत ४५ डिग्री ने ब्रश करणे. नेहमी ब्रश दातांवर गोलाकार पद्धतीने फिरवून दात घासावेत, दात घासताना ब्रश कधीही तिरपा पकडू नये, कारण हे आपल्य

दात बसवणे- प्रकार आणि पद्धती ( कॅप, ब्रीज वर्क, इंप्लांट इ. )

Image
आपले दात चांगले असतील तर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. दात सुंदर, पांढरे शुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो. यासाठी आपण आपल्या दातांची काळजी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. वय वाढणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. वयानुसार मनुष्याला शारीरिक समस्यांसोबत दातांच्या समस्येलाही सामोरं जावं लागतं. सामान्यतः अशा लोकांमध्ये दात पडणं, दात हलणं, कीड लागणं या समस्या प्रामुख्याने दिसतात. तर एक किंवा त्यापेक्षा जास्त दात नसणं आणि त्यामुळे चर्वण क्रियेवर परिणाम होणं, पचन शक्ती कमी होणं अशा अडचणी पाहायला मिळतात. किडलेले दात हे Restorative Cements (Light Cure) किंवा Root-Canal Treatment ने व्यवस्थित केले जातात. दात खूप हलत असेल तर तो काढून तिथे नवीन दात बसवता येतात. दात हलण्यामागे साधारण हिरड्यांचे आजार किंवा हाडाची पकड सैल होणं असू शकतं. त्यामुळे नवीन दात बसवताना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. दातांची कवळी ही सगळ्यात जुनी आणि लोकप्रिय उपचारपद्धती असून, त्यामध्ये सर्व दात (Complete Denture) किंवा जे दात नाहीत फक्त ते नवीन बसवता येतात. (Removable Partial Denture) वरील दोन्ही