डिप्रेशन आणि आपण....
आज अचानक बातमी आली आणि धक्काच बसला. सुशांत सिंग राजपूत ने आपल्या मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केली. तसे या वर्षी बरेच धक्के आपण सहन केलेत. कितीतरी चांगल्या कलाकारांना गमावलं आपण यावर्षी. त्यातले काहीजण वृध्द होते, काही आजारी आणि काही मानसिकरीत्या आजारी.
डिप्रेशन सध्या सगळ्यात मोठा आजार झालंय. होय, कोरोणा पेक्षा ही भयानक आजार. इतर आजारांमध्ये तुम्हाला आजाराची लक्षणं दिसतात, इतर लोक तुमची काळजी घेतात पण डिप्रेशन हा असा आजार आहे की त्यात बऱ्याचवेळा तुम्हालाच कळतं ही नाही, ना तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना. खरतर आपल्याकडे या गोष्टीला तेवढस महत्वचं दिलं जात नाही. बरेच जण तर बोलायलाच घाबरतात कारण आपण जर बोललो तर लोक हसतील, नाहीतर आपल्याला थोडंसं सकारात्मक काहीतरी बोलुन ज्ञान द्यायचं काम करतील, यापुढे काही होणार नाही.
डिप्रेशन हा सध्याच्या तरुण पिढीत वाढणारा सगळ्यात वाईट आजार झालाय. सोशल मीडियाच्या जगात १००-२०० मित्र असून सुद्धा ज्याच्याशी आपण आपल्या मनातलं शेअर करू शकतो, जो आपल्याला समजून घेऊ शकतो असा एकही मित्र आपल्या भेटू नये? का आपण उघडपणे आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करू शकत नाही? आपल्याबद्दल लोक काय विचार करतील हे एवढं महत्वाचं आहे का ? आत्महत्या करणं खरचं एवढं सोपं झालंय ? मरणाच्या वेदणेपेक्षा स्टेटस जास्त महत्वाचं वाटू लागलंय.
डिप्रेशन कोणालाही येऊ शकत. त्यात लाजण्यासारख काही नाही. दिवसभर ऑनलाईन राहून वायफळ बडबड करण्यापेक्षा, फालतू मेम्स शेअर करत बसण्यापेक्षा, आपल्या मोजक्याच आणि चांगल्या मित्रांबरोबर बोला. आपले प्रॉब्लेम शेअर करा. नक्कीच ते तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या सोबत जर आपले कोणी प्रॉब्लेम्स शेअर करत असेल तर त्यांच्या मानसिक स्थिती चा अंदाज घ्या त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी मदत करा. योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जीवन खुप सुंदर आहे...
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......