दात बसवणे- प्रकार आणि पद्धती ( कॅप, ब्रीज वर्क, इंप्लांट इ. )
आपले दात चांगले असतील तर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. दात सुंदर, पांढरे शुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो. यासाठी आपण आपल्या दातांची काळजी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. वय वाढणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. वयानुसार मनुष्याला शारीरिक समस्यांसोबत दातांच्या समस्येलाही सामोरं जावं लागतं. सामान्यतः अशा लोकांमध्ये दात पडणं, दात हलणं, कीड लागणं या समस्या प्रामुख्याने दिसतात. तर एक किंवा त्यापेक्षा जास्त दात नसणं आणि त्यामुळे चर्वण क्रियेवर परिणाम होणं, पचन शक्ती कमी होणं अशा अडचणी पाहायला मिळतात. किडलेले दात हे Restorative Cements (Light Cure) किंवा Root-Canal Treatment ने व्यवस्थित केले जातात. दात खूप हलत असेल तर तो काढून तिथे नवीन दात बसवता येतात. दात हलण्यामागे साधारण हिरड्यांचे आजार किंवा हाडाची पकड सैल होणं असू शकतं. त्यामुळे नवीन दात बसवताना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. दातांची कवळी ही सगळ्यात जुनी आणि लोकप्रिय उपचारपद्धती असून, त्यामध्ये सर्व दात (Complete Denture) किंवा जे दात नाहीत फक्त ते नवीन बसवता येतात. (Removable Partial Denture) वरील दोन्ही ...
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......