‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?
तोंडात येणारी शेवटची दाढ म्हणजे अक्कल दाढ . वयाच्या १७ ते २५ वर्षांपर्यंत अक्कल दाढ तोंडात येऊ लागते. कधी कधी २५ वर्षांनंतर सुद्धा ही दाढ अचानक तोंडात येऊ शकते. असे म्हटले जाते की आधीच्या काळात मनुष्याचा आहार हा खूप उग्र प्रकारचा असल्याने दात झिजून जात असत. मग दात झिजल्याने जबड्यात बदल घडून येत. तोंडातील सगळे दात नैसर्गिकरीत्या हालचाल करून घडलेल्या बदलाची भरपाई करत असत. म्हणूनच तरुणपणी तोंडात येणार्या अक्कल दाढेला पुरेशी जागा मिळून दात सहजपणे बाहेर निघून येत असत. आताच्या काळात आहार मऊ, दातांना त्रास न होणारा असतो. तसेच हल्लीच्या काळात ऑर्थोडोंटिस्टच्या साहाय्याने वाकडे-तिकडे असलेले दात सारखे करण्याची पद्धत खूपच लोकप्रिय झाली असून लहान वयातच मुलांचे दात चांगले दिसावे म्हणून ऑर्थोडोन्टिस्टचा भरपूर वापर केला जातो. यामुळे तरुण वयात येणार्या अक्कल दाढेला जागाच शिल्लक राहात नाही. याचा परिणाम म्हणून अक्कलदाढेसंबंधित समस्या आढळून येतात. इम्पॅक्टेड दाढ – तोंडात पुरेशी जागा नसल्याने, दातांवरती असलेली हिरडी खूप जाड होऊन दाताला वर येऊ देत नसल्याने, तसेच दातांभोवती असलेले हाड किंवा अक्
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......