शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं !
लहानपणी आई डबा करून दयायची पण ... लोकांना हॉटेल मध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं..आपण ही खावं. पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं.
मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो , तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली.
शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं !
लहानपणी मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे.
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले...सुती कपडे महाग झाले.
शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं !
लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून दयायची .. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची.
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले.
शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं !
लहान होतो तेव्हा दुध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा ... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो .. वाटायचं आपणही प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.
शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं !
आता कळलं...,
हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं
जसा आहे,
तसाच रहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही....
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......