एक पक्षी🐤 आणि त्याच्या 🐥पिल्लाचे संभाषण

🤷‍♀आई आई आई 
मला काही कळत नाही 
कालपर्यंत आकाशात होता धूर धूर 
आता सगळं स्वच्छ 👌🏻दूर दूर 
आकाशात विमानं घिरट्या नाही घालत 
रस्त्यावर एकही वाहन नाही चालत 
अचानक असे काय गेले घडून 
सगळे मनुष्य कुठे बसले दडून 🤔

काय सांगू तुला बाळा 
संकटाला घालायला आळा 
निसर्गाने🌳 दिली आहे माणसाला शिक्षा 
घरात त्याला कोंडून घेतोय त्याची परीक्षा 
तो घराबाहेर पडला तर होईल त्याचा अंत 
त्याच्यावर ही वेळ यावी याची मला आहे खंत 😔

माणूस काय चुकीचा वागला 
म्हणून हा त्रास भोगावा लागला 🤔
साऱ्या जीवांची निसर्ग🌳 एकच माय 
मग फक्त माणसांवर हा प्रसंग कसा काय 🤔
आपण सारे मुक्त 
मग तोच का बंदिस्त 🤔

बाळा,  माणसाने चूक मोठी केली 
इतर कोणाचीच त्याने फिकीर नाही केली 😏
निसर्गाचे🌳 संतुलन त्याने नाही पाळलं 😔
साऱ्यांचे हीत जपणे त्याने मात्र टाळलं 
त्याने मोडली निसर्गाची शिस्त 
म्हणून तो आहे आज बंदिस्त 😔

आई, त्याच्या पिल्लांची मला आहे चिंता 
कोणाशी खेळतील आणि काय खातील आता 
माणूस जरी चुकला तरी आपण करू मदत 
चोचीत धरून दाणा,  पोहोचवू त्याला रसद 
खेळीन मी त्यांच्याशी खिडकीत बसून 
ठेवीन त्यांना आनंदी हसवून आणि हसून 

माझं बाळ ते किती गं गुणाचं 
नाही पाहवत त्याला वाईट कुणाचं 
तुझ्या सारखा विचार जेव्हा सारे करतील 
तेंव्हाच या संसारातले सारे सुखी होतील 
माणसाला त्याची चूक लवकर कळू दे 
त्याच्यावर आलेले संकट लवकर टळू दे .🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

दात बसवणे- प्रकार आणि पद्धती ( कॅप, ब्रीज वर्क, इंप्लांट इ. )

‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?

दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार