‘सिकल सेल अॅनिमिया’
सिकल सेल ’ या आजाराविषयी सांगणाऱ्या जाहिराती रेडिओवर, टीव्हीवर बऱ्याचदा ऐकायला, पाहायला मिळतात. पण हा आजार नेमका काय असतो, तो कुणाला होण्याची शक्यता अधिक, त्यावर काही उपचार आहेत का, याबद्दल अनेकांना माहिती नसते. १९ जून हा दिवस जागतिक सिकल सेल दिवस म्हणून पाळला गेला. या निमित्ताने या आजाराविषयी- 'सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता . ‘सिकल सेल अॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. पण सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. या दोषाला ‘सिकलिंग गुणधर्म’ असे म्हणतात. निरोगी माणसाच्या आणि सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना सिकल सेल पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून आला. दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव देण्यात आले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे