दातांची कीड समस्या आणि काळजी : थेट दंतवैद्यांच्या शब्दात !!
आजकाल "दोन रूपयांत दातांमधली कीड घालवा"सारखे लेख फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर फिरू लागले आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी असे सगळ्यांनाच वाटतं. पण होतं काय, हे फॉर्वर्ड्समधून आलेले उपाय खरेच असतात की नाही याबद्दल जबरदस्त शंका असते. अर्थातच, दंतविकार टाळण्यासाठी आपण काय घरगुती काळजी घेऊ शकतो याबद्दलचे पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही प्रश्नोत्तरे मांडण्यात आली आहेत. मात्र गंभीर आजार किंवा विशेष मुलांच्या आजारांच्या बाबतीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. इथं दिलेली उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्या दाताच्या आजारांबद्दल आहेत. प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय ? Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात. ते असो. त्या हातचलाखीबद्दल पुन्हा कधीतरी... तोंडात असलेले जीवाणू दातावर साठून राहिलेल्या अन्नकणांमधल्या साखरेवर प्रक्रिया करून ऍसिड तयार करतात आणि या ऍसिडमुळे दाताच्या पृष्ठभागावरचे आवर...

Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......