लॉकडाउन आणि आठवणीतली मुंबई लोकल
कोरोना हे तू काय केलसं? मुंबईत लोकल रेल्वेने प्रवास करणं म्हणजे विश्वरुपदर्शन आहे. संयमाची, शारीरिक कणखरतेची, चिवटपणाची, संवादकौशल्याची कसोटीच जणू. सकाळी खरंतर पहाटेपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातून जनांचा प्रवाह मुंबईच्या दिशेने कामासाठी ओसंडून वाहत राहतो. 8.10ची फास्ट पकडणं हे अनेकांसाठी आद्य कर्तव्य असतं. दिवसाचं वेळापत्रक रेल्वेकेंद्रित असतं. गच्च भरून आलेल्या ट्रेनमध्ये उडी मारून आत जाणं, बसायला जागा मिळावी यासाठी फिल्डिंग लावणं, आपली बॅग वरती डोक्यावरच्या बॅगांच्या चळतीत घुसवणं, आपल्या सगळ्या वस्तू जागेजमी आहेत ना याची चाचपणी करणं आणि मोबाईलचे इअरफोन काढून गर्दीतही बेट होणं हे अनेकांचं आयुष्य असतं. दोस्तांचा ग्रुप असेल तर ट्रेन्डिंग टॉपिकवर गप्पा सुरू होतात. काल रात्री झालेल्या मॅचवर गप्पा रंगतात. जोकवर हशा पिकतो. खांदेपालटाच्या स्टेशनवर म्हणजे बसलेली माणसं उठतात आणि पॅसेज मध्ये उभं असणाऱ्यांना बसायला देतात. माणुसकीचा धर्मचं तो.चौरस फूटात जास्तीत जास्तीत माणसं कोंबून भरलेल्या त्या डब्यातून बाजूने मंदिर गेलं की एक हाताने दर्शन घेतात. प्रत्येक स्टेशनवर 'अंदर चलो' म्हणत माण